२०१६-०४-२६

गीतानुवाद-०७६ः मैं जहाँ चला जाऊँ

मूळ हिंदी गीतकार: आनंद बख्शी, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक किशोरकुमार
चित्रपटः बनफूल, सालः १९७१, भूमिकाः शत्रुघ्न सिन्हा, असराणी, बबिता, जितेंद्र

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३११


धृ
मैं जहाँ चला जाऊँ
बहार चली आए
हो महक जाए राहों की धूल
मैं बनफूल बन का फूल
मी जिथे जिथे जाईन
बहार तिथे येई
परिमळते वाटेतली धूळ
मी वनफूल, वनचे फूल

बैरी बड़ा ज़माना, कदर मेरी ना जाना
किसी की भी आँखों ने, मुझे नहीं पहचाना
दुनिया गई मुझको भूल
वैरी जणू जग आहे, मम किंमत ना पाही
कुणाचीही नजर मला, ओळख देत नाही
दुनियेला पडली जणू भूल

फिरूँ रे मैं बनजारा डगर-डगर आवारा
किसी दिलवाले का, ढूँढूँ मैं सहारा
मुझे कोई कर ले क़ुबूल
फिरू मीही वनवासी, सैर-भैर अनिवासी
कुणा दिलवराच्या, मी शोधू सहार्‍यासी
करो कुणी मजला कबूल



२०१६-०४-०८

गीतानुवाद-०७५ः रहा गर्दिशों में


मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायकः रफी
चित्रपटः दो बदन, सालः १९६६, भूमिकाः मनोज कुमार, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१५

धृ
रहा गर्दिशों में हरदम
मेरे इश्क़ का सितारा
कभी डगमगायी कश्ती,
कभी खो गया किनारा
सदा विघ्नवश राहिला
हा माझा प्रीततारा
कधी नाव डळमळे ही
कधी हरपला किनारा

कोई दिल का खेल देखे
कि मुहब्बतों की बाज़ी
वो क़दम क़दम पे जीते
मैं क़दम क़दम पे हारा
कोणी मनचा खेळ पाहा
प्रीतीचा डावही हा
जिंके पदोपदी ती
जो पदोपदी मी हारला

ये हमारी बदनसीबी
जो नहीं तो और क्या है
कि उसी के हो गये हम
जो न हो सका हमारा
ही माझी बदनशीबी
नाहीतर आणखी काय आहे
की तिचाच जाहलो मी
जी न माझी होऊ शकली

पड़े जब ग़मों के पाले
रहे मिटके मिटनेवाले
जिसे मौत भी न पूछा
उसे ज़िंदगी ने मारा
जेव्हा दुःखाशी गाठ पडली
जे होणार, नष्ट झाले
ना विचारी मृत्यू ज्याला
त्याला जीवनाने छळले







२०१६-०४-०६

गीतानुवाद-०७४ः कहीं दीप जले कहीं दिल

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः हेमंत, गायीक: लता
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिका विश्वजीत, वहिदा रहेमान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०६

धृ
कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल
कुठे दीप जळे कुठे प्रीत
येऊन जरा बघ तू पतंगा
तुझे कोणते आहे ईप्सित
कुठे दीप जळे कुठे प्रीत

मेरा गीत तेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफ़िल
माझे गीत तुझ्या प्रीतीची आस आहे
जिथे मी आहे तिथेच तुझी प्रीत आहे
माझे मन आहे मैफिल तुझीच

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर न कर, आ मिल
ना मी स्वप्न कुठले ना मी गूढ आहे
मी तर आर्त असा एक सूर आहे
प्रिया भेट, न कर तू उशीर

दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं क़ातिल
शत्रू इथे जीवाचे हजारो
ओळखून नजर तू भेट
किती रूपांत काळ वसे





२०१६-०४-०३

गीतानुवाद-०७३ः ले के पहला पहला प्यार

गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर, गायक: आशा, रफी, शमशाद बेगम
चित्रपट: सी. आय. डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०३



धृ
ले के पहला पहला प्यार
भर के आँखों में खुमार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
घेऊन पहिली पहिली प्रीत
तेजही डोळ्यातून मिरवीत
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार



मुखड़े पे डाले हुये, जुल्फों की बदली
चली बलखाती कहा, रुक जाओ पगली
नैनोवाली तेरे द्वार,
ले के सपने हज़ार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
चेहर्‍यावर ओढून घेऊन, केसांचे ढग हे
लचकत निघालीस कुठे, थांब जरा ग खुळे
नेत्रावती तव दारात,
घेऊन स्वप्ने हजारात
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार



चाहे कोई चमके जी, चाहे कोई बरसे
बचना हैं मुश्किल, पिया जादूगर से
देगा ऐसा मंतर मार,
आख़िर होगी तेरी हार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
हवे त्यास चमकू दे, हवे त्यास बरसू दे
जादुतून प्रियाच्या, कठीण आहे सुटणे
मंत्र टाकि, घालत वार,
होईल शेवटी तुझीच हार
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार



सुन सुन बाते तेरी गोरी मुसकाई रे
आई आई देखो देखो, आई हँसी आई रे
खेलें होंठों पे बहार,
निकला गुस्से से भी प्यार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
कूतव गूज पाहा, तिची कळी खुलली रे
आले आले आले रे, ओठी हसू आले रे
विहरे ओठांवरती बहार,
फुलतो रागातून अनुराग
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार